Homeकला - क्रीडाकेडीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या तांत्रिक समितीची दुसरी बैठक संपन्न

केडीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या तांत्रिक समितीची दुसरी बैठक संपन्न

‘ट्रांजेक्शन ॲडव्हायझर’ नियुक्ती प्रक्रियेतील १५ संस्थांवर सखोल चर्चा
कोल्हापूर :
विकासवाडी येथील केडीसीएच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या तांत्रिक समितीची दुसरी बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)चे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि तांत्रिक समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.
कोल्हापूर जिल्ह्याने ‘महास्ट्राईड’ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत १०० टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तांत्रिक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दि. २५ जुलै रोजी झालेल्या तांत्रिक समितीच्या पहिल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्टेडियम आराखड्यासाठी ‘ट्रांजेक्शन ॲडव्हायझर’ नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दि. ४ ऑगस्ट रोजी ‘बिझनेस स्टँडर्ड’ या व्यावसायिक दैनिकात निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेत एकूण १५ इच्छुक संस्थांनी सहभाग घेतला.
या सर्व संस्थांच्या पात्रतेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यापैकी काही संस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या प्रकल्पासाठी योग्य ठरू शकतात, असा प्राथमिक निष्कर्ष समितीने काढला. केडीसीएने निश्चित केलेल्या निकषांनुसार या संस्थांचे मूल्यांकन करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
बैठकीस तांत्रिक समितीचे सदस्य सुहास पाटील (उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा), व्ही. बी. पाटील, अनिल पाटील, स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता एमएसईबी तुषार बुरूड, अधीक्षक अभियंता बी अँड सी चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता सिंचन विभाग अनिल शिंदे, विमानतळ संचालक इराप्पा नाईक, कार्यकारी अभियंता एमआयडीसी प्रकाश देवलापूरकर, ॲड. रवि शिराळकर, प्रशांत कापडी, मकरंद रणदिवे, केडीसीएचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर, उपाध्यक्ष ऋतुराज इंगळे, सचिव अभिजीत भोसले, खजानिस मदन शेळके, सहसचिव शीतल भोसले, अजित मुळीक, डॉ. संजय पाठारे, कृष्णात धोत्रे, जनार्दन यादव आदी उपस्थित होते. ही माहिती केडीसीएचे सचिव मदन शेळके यांनी दिली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
78 %
4.1kmh
99 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page