• कै. रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रानभाजी स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर :
राधानगरी तालुक्याच्या डोंगर दऱ्या – खोऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात विविध रानभाजीचा साठा असुन या रानभाज्यांची सर्वत्र ओळख निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले. कै. रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
कार्यक्रमात संभाजीनगरच्या ॲडिशनल सीईओ सुषमा देसाई, अँटी करप्शनच्या डीवायएसपी वैष्णवी पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विलास रणदिवे यांनी मनोगते व्यक्त केली.
स्पर्धेत १०० पेक्षा जास्त रानभाज्या समाविष्ट झाल्या होत्या. स्पर्धेत २४ महिलांनी भाग घेतला. यामध्ये प्रथम पाच क्रमांक अनुक्रमे मनीषा विलास रणदिवे, उर्मिला लक्ष्मण कोंडवळ, शोभा सुरेश राणे, संगीता धनाजी बावडेकर, पुनम रमेश निकम यांनी पटकाविले. सहभागी महिलांना स्टील परात, श्री गणेश मूर्ती लकी ड्रॉ, तसेच एक ते पाच विजेत्यांना ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेत १०० पेक्षा जास्त रानभाज्या समाविष्ट झाल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुधीर दोरुगडे, सुजीत पाटील यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या मनीषा यादव, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद एकावडे, सौ. लता एकावडे, विलास रणदिवे, वृषाली एकावडे, प्रणित एकावडे, ऋतुराज एकावडे, सुभाष चौगले, ग्रामपंचायत सदस्य रवी नरसाळे, दिपाली टिपुगडे, बाळासो नरसाळे, उमेश जाधव, रामचंद्र सावंत, शारदा डब्बे, रेखा साळोखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विश्वास आरडे यांनी केले.
——————————
राधानगरीच्या रानभाज्यांची ओळख निर्माण करा : तहसीलदार अनिता देशमुख
Mumbai
scattered clouds
29
°
C
29
°
29
°
74 %
3.6kmh
35 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
27
°

