• मंत्री पंकज मुंडे यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर :
श्री सिद्धगिरी मठ संस्थान तर्फे स्थापन करण्यात आलेल्या खाजगी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या उदघाटनाचा लोकार्पण सोहळा आणि पशुपालक मेळावा गुरुवारी, दिनांक ३ सप्टेंबर रोजी कणेरी मठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. उदघाटन सोहळा राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल खात्याच्या मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी दिली.
गुरुवारी (दि.३) मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रियाताई महेश शिंदे, आमदार अमल महाडिक, उत्तर प्रदेशच्या पंडित दीनदयाल उपाध्य पशुचिकित्सा विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. कृष्ण मुरारीलाल पाठक, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालयाचे संयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर, चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वास चितळे आणि जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कोल्हापूर डॉ. प्रमोद बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
महाविद्यालयाच्या बोधचिन्हांचे प्रकाशन आणि पशु सर्व चिकित्सालयाच्या उपचार सेवा विस्तारीकरणासाठी गोकुळ दूध संघाशी सामंजस्य करार संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. मुरुगप्पा यांनी दिली. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पशुपालक मेळाव्यासाठी उपस्थित होणाऱ्या दूध उत्पादकांना देशी गोवंश प्रदर्शन आणि गोवंश चलीत कृषी यंत्रांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र सिंग यांनी कळविले आहे. या संस्थांनचे कार्यकारी संचालक डॉ. यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. पी. वड्ड, विक्रम पाटील व प्रल्हाद जाधव यांच्यासह संस्थांच्या सर्व संचालक मंडळाकडून आणि नियोजनाची तयारी सुरू आहे.
या निमित्याने श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनात पशुपालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी समृद्ध पशुपालन आणि सक्षम दूध व्यवसायासाठी डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. अंकुश परिहार, डॉ. प्रशांत योगी, डॉ. दिनेश टाकळीकर, डॉ. विनोद पाटील, पांडुरंग काळे, डॉ. पुष्पनाथ चौगुले, डॉ. कैवल्य देशमुख, डॉ. राऊ भांगे या तज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे.
—————————— ————————-

——————————