Homeराजकियसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

• कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत
कोल्हापूर :
संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित राहून वारकर्‍यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वारकर्‍यांचे स्वागत करून त्यांना खाऊचे वाटप केले. हजारो वारकर्‍यांची सेवा करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच, भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षाद्वारे वारकर्‍यांना प्राथमिक आरोग्य सेवा, आवश्यक औषधे तसेच वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. पालखी मार्गावरील वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम विशेषत्वाने राबविण्यात आला. या सेवा उपक्रमाला वारकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलवनकर, सचिन जायभाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31 ° C
31 °
30.9 °
70 %
4.6kmh
78 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page