• ४.४५ कोटी ग्राहकांसह ४२.७% बाजारहिस्सा
• दशकभरात जिओच्या ग्राहकसंख्येत ४५.५ पट वाढ
कोल्हापूर :
रिलायन्स जिओने महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर म्हणून आपले स्थान भक्कम केले असून, गेल्या दशकभरात केलेल्या उल्लेखनीय विस्तारामुळे राज्याच्या दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे.
महाराष्ट्रातील जिओच्या प्रवासाची सुरुवात सप्टेंबर २०१६ मध्ये अवघ्या ९.८ लाख ग्राहकांपासून झाली. जून २०२६ पर्यंत जिओची ग्राहकसंख्या तब्बल ४४४.८ लाख अर्थात सुमारे ४.४५ कोटी झाली. म्हणजेच अवघ्या दहा वर्षांत जिओच्या ग्राहकसंख्येत तब्बल ४५.५ पट वाढ झाली आहे.
महाराष्ट्राच्या वायरलेस बाजारपेठेत ४२.७% बाजारहिस्सा मिळवत जिओ आज राज्यातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर ठरला आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२६ ते जून २०२६ या कालावधीत जिओने निव्वळ ४३५.१ लाख नवीन ग्राहक जोडले. या कालावधीत जिओच्या ग्राहकसंख्येत ४७.९% च्या CAGR दराने वाढ झाली, जी इतर प्रमुख ऑपरेटरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. याच कालावधीत एअरटेलची CAGR ९.८% राहिली, तर व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत घट झाली.
जिओच्या वेगवान विस्तारामुळे महाराष्ट्रातील दूरसंचार बाजारपेठेतील स्पर्धात्मक समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. बाजारात प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, ऑगस्ट २०१८ मध्ये जिओने एअरटेलला मागे टाकले. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये जिओ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर बनला आणि तेव्हापासून त्याने राज्यातील क्रमांक १ चे स्थान कायम राखले आहे.
जिओच्या वाढीसोबत महाराष्ट्रातील एकूण बाजारपेठेचाही विस्तार…
जिओची वाढ केवळ इतर ऑपरेटरकडून ग्राहक मिळवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. गेल्या दशकात महाराष्ट्रातील एकूण वायरलेस बाजारपेठेतही लक्षणीय विस्तार झाला आहे.
राज्यातील एकूण वायरलेस ग्राहकसंख्या सप्टेंबर २०१६ मधील ८४९.७ लाखांवरून जून २०२६ मध्ये १,०४१.५ लाखांवर पोहोचली. म्हणजेच या कालावधीत एकूण वायरलेस ग्राहकसंख्येत २२.६% वाढ झाली.
या दशकात दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरणही झाले. २०१६मध्ये महाराष्ट्रातील बाजारपेठेपेक्षा अधिक ऑपरेटर कार्यरत होते. त्यानंतर दूरसंचार बाजारपेठेचे स्वरूप बदलत जाऊन आज ती प्रामुख्याने चार प्रमुख ऑपरेटरभोवती केंद्रित झाली आहे.
‘इतर’ (Others) या श्रेणीतील ग्राहकसंख्या ऑगस्ट २०१६ मधील २१६.५ लाखांवरून जुलै २०१९ पर्यंत शून्यावर आली. जून २०२६ अखेर महाराष्ट्रात एकूण १,०४१.५ लाख वायरलेस कनेक्शन्स होती. त्यामध्ये जिओचा सर्वाधिक वाटा होता.
सप्टेंबर २०१६ मधील ९.८ लाख ग्राहकांपासून जून २०२६ मधील ४४४.८ लाख ग्राहकांपर्यंतची जिओची झेप ही महाराष्ट्रातील दूरसंचार क्षेत्रातील सर्वात वेगवान विस्तारांपैकी एक आहे.
गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या मोबाईल बाजारपेठेत मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन झाले आहे. जिओच्या वेगवान विस्तारासोबतच राज्यातील एकूण वायरलेस कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली असून, आघाडीच्या दूरसंचार ऑपरेटरभोवती बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाले आहे.
——————————
महाराष्ट्रातील जिओची दशकभराची दमदार वाटचाल
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
78 %
4.1kmh
99 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°

