Homeकला - क्रीडापंचांच्या निर्णयक्षमतेला धार देण्यासाठी प्री-सीजन कार्यशाळा उत्साहात

पंचांच्या निर्णयक्षमतेला धार देण्यासाठी प्री-सीजन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर :
आगामी क्रिकेट हंगामाच्या पार्श्वभूमीवर पंचांचे तांत्रिक ज्ञान, निर्णयक्षमता आणि नियमांमधील अचूकता अधिक सक्षम करण्यासाठी दोन दिवसीय ‘प्री-सीजन प्रिपरेटरी वर्कशॉप फॉर अंपायर्स’ कार्यशाळा हॉटेल ॲट्रिया येथे उत्साहात पार पडली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)ने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेत कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील एमसीए समितीचे एकूण ४३ पंच सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे उदघाटन केडीसीएचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी केडीसीएचे सचिव मदन शेळके व सहसचिव डॉ. संजय पाठारे उपस्थित होते.
दोन दिवसीय सत्रात आयपीएल व बीसीसीआयचे आंतरराष्ट्रीय पंच स्वरूपानंद कुन्नुर, एमसीए पंच समितीचे सदस्य अजय देशपांडे तसेच बीसीसीआय पॅनेल पंच रोहन इंगवले यांनी पंचांना मार्गदर्शन केले.
क्रिकेटच्या आधुनिक नियमांमधील बदल, सामन्यातील तणावपूर्णप्रसंगी अचूक निर्णय घेण्याची पद्धत, पंचांमधील समन्वय आणि खेळाडूंशी सुसंवाद याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पंचांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती तसेच सामन्यापूर्वीची तयारी यावरही विशेष भर देण्यात आला. मैदानावरील प्रत्येक चेंडूवरील पंचांचा निर्णय सामन्याचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे अशा दर्जेदार प्रशिक्षणामुळे राज्यातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधील पंचगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमनचे स्पोर्ट्स सायंटिस्ट डॉ. अभिषेक देव व केडीसीएचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर यांनी सदिच्छा भेट दिली. डॉ. देव यांनी पंचांना मार्गदर्शन करताना मैदानावर दिवसभर उभे राहावे लागत असल्याने पंचांनीही खेळाडूंप्रमाणेच शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी व्यायाम, योगासने तसेच बौद्धिक आकलनशक्ती वाढविणारे व्यायाम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक बाबी आणि अँटी-डोपिंग विषयावरही त्यांनी माहिती दिली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
78 %
4.1kmh
99 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page