कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर विभागीय बुध्दीबळ (मुले-मुली) स्पर्धांचे आयोजन श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय, कापशी, ता.शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजच्या मुलींच्या संघाने एकूण १९ गुण संपादित करुन प्रथम क्रमांक मिळवून जनरल चॅम्पियनशीप मिळविली. तसेच मुलांच्या संघाने १८.५ गुण मिळवून व्दितीय क्रमांक प्राप्त करुन संघ रनर अप ठरला.
मुलींच्या संघामध्ये तन्वी राऊत, आरती पाटील, तृप्ती दिंडे, चैत्राली चौगुले, सिंदी पेरसपुरे तर मुलांच्या संघात दर्शन शिंदे, सर्वेश डाकवे, सिध्देश शिंदे, सुबोध कांबळे व हर्षल माळी यांचा समावेश होता.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद एस. हुजरे यांनी अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
विभागीय बुध्दीबळ स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला जनरल चॅम्पियनशीप
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
78 %
4.1kmh
99 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°

