HomeUncategorizedडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

डी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील अन्न तंत्रज्ञान विभागातर्फे बी.टेक. आणि तसेच एम.एस्सी. फूड सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय एच.ए.सी.सी.पी, एफ.एस.एस.सी आणि फॉस्टॅक अंतर्गत ऑडिटर प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.
अन्न प्रक्रिया व निर्मिती उद्योगांमध्ये अन्न स्वच्छता, अन्न सुरक्षा, गुणवत्ता व्यवस्थापन आणि सुरक्षित उत्पादन पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना सखोल तसेच व्यावहारिक ज्ञान मिळावे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. प्रमाणित मास्टर ट्रेनर डॉ. रामेश्वर जाजू यांनी विद्यार्थ्यांना ‘हॅझर्ड ॲनॅलिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट’ अर्थात एचएसीसीपी, एफएसएससी २२००० आणि फॉस्टॅक मानकांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. अन्न उद्योगातील स्वच्छता, सुरक्षितता, गुणवत्ता आणि योग्य दस्तऐवजीकरणाचे महत्त्व त्यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले.
प्रशिक्षणात अन्न स्वच्छता व स्वच्छताविषयक पद्धती, अन्न सुरक्षेतील संभाव्य धोके, जीएमपी, जीएचपी, पीआरपी, क्रिटिकल कंट्रोल पॉइंटची ओळख, धोक्यांचे विश्लेषण, क्रिटिकल लिमिट्स, निरीक्षण व सुधारात्मक उपाययोजना, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली आणि अंतर्गत ऑडिट प्रक्रिया याबाबत सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया व उत्पादन उद्योगांमध्ये अन्न सुरक्षा मानकांची अंमलबजावणी आणि ऑडिटची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजून घेता आली.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली, स्वच्छता पद्धती, जोखीम विश्लेषण आणि अंतर्गत ऑडिट यासंबंधी आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानासोबतच औद्योगिक कौशल्यविकास आणि रोजगारक्षमतेसाठी या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होईल असा विश्वास  अन्न तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रमसिंह इंगळे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, आयक्यूएसी संचालक डॉ. शिवानंद शिरकोळे आणि प्रा. कुमार चक्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page