Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजच्या ऋतुजा एकुंडे यांना पीएच.डी.

विवेकानंद कॉलेजच्या ऋतुजा एकुंडे यांना पीएच.डी.

कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाची संशोधक विद्यार्थीनी कु. ऋतुजा अनिल एकुंडे हिला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची भौतिकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.
त्यांचा पीएचडी प्रबंधाचा विषय “स्टडीज ऑन द फोटोथर्मल सुपरहायड्रोफोबिक कोटिंग्स फॉर सेल्फ-स्टेरिलायझेशन अँड सेल्फ – क्लिनिंग एप्लिकेशन्” होता. या संशोधनासाठी त्यांना विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय सुभाष लठ्ठे आणि राजे रामराव महाविद्यालय जतचे प्रा. डॉ. आप्पासाहेब कुंडलिक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. ऋतुजा हिने चार वेगवेगळ्या प्रकारचे फोटोथर्मल नॅनोमेटेरियल् आणि पॉलिमर चे मिश्रण वापरून दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या कॉटनच्या कपड्यावर फोटोथर्मल सुपरहायड्रोफोबिक कोटींग तयार केले आहेत. सध्याच्या वाढत्या करोना सारखे संसर्गिक रोगाचे नियंत्रित करण्यामध्ये फोटोथर्मल सुपरहायड्रोफोबिक कोटींग केलेल्या कॉटन कपडे आरोग्य क्षेत्रात खुप फायदेशीर ठरणार आहेत. या संशोधनात वापरलेले फोटोथर्मल मटेरियल्स प्रकाशापासून उष्णता निर्माण करतील आणि उष्णतेमुळे कापडावरील (फेस मास्क आणि अप्रोन) संसर्गजन्य  विषाणू मारले जातील. त्याचबरोबर सुपरहायड्रोफोबिक प्रॉपर्टीज मुळे कापडावरील मृत विषाणू आणि धुळ पाण्या बरोबर स्वच्छ होतील. हे संशोधन आरोग्य क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या फेस मास्क आणि अप्रोन स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्यात फायदेशीर ठरणार आहेत.
या संशोधनासाठी कु. ऋतुजास प्रा. डॉ. संजय सुभाष लठ्ठे आणि प्रा. डॉ. आप्पासाहेब कुंडलिक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. कु. ऋतुजा यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, डॉ. श्रुती जोशी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सीईओ कौस्तुभ गावडे आणि प्रबंधक सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याव्यतिरिक्त चीन मधील हेनान विद्यापीठातील नामांकित प्रा. शानाहू लिऊ आणि डॉ. राजाराम सुतार यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page