कोल्हापूर :
स्व. वेणूताई चव्हाण व प्राचार्य शिवाजीराव भोसले हे सातारा जिल्ह्याचे भूषण असून, त्यांचे विचार आजच्या पिढीने आचरणात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत श्रीधर साळुंखे यांनी केले.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग व वाड्मय मंडळ यांनी स्व. वेणूताई चव्हाण आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या स्व. वेणूताई चव्हाण आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना समजून घेताना या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे हे होते. याप्रसंगी वाड्मय मंडळाचे समन्वयक डॉ. संग्राम थोरात यांची उपस्थिती होती.
श्रीधर साळुंखे म्हणाले, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचे तसेच जन्मशताब्दींचे विविध कार्यक्रम घेतल्याने त्यांच्या कार्याची ओळख समजला नव्याने होत असते. वेणूताई चव्हाण या सुसंस्कृत व प्रगत विचारांच्या होत्या. साधेपणातच त्यांनी सुख मानले. लहानपणीच त्यांना देशभक्ती आणि स्वातंत्र्य चळवळ यांच्या विषयी आदर वाटत होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात यशवंतराव चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेतला, तेव्हा एक आदर्श गृहिणी म्हणून त्यांनी संसाराची जबाबदारी पेलली. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. चव्हाण साहेबांचे राजकारणातील व समाजकारणातील योगदान हे बहुमोल असून, त्या पाठीमागे वेणूताई चव्हाण यांचे समर्पण होते.
मी स्वतः प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा शिष्य असून, त्यांच्या विचारांचा व वक्तृत्वाचा पगडा माझ्यावर असल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे म्हणाले, थोर व्यक्तींचे आदर्श हे समाजातील इतर लोक घेत असतात. त्यामुळे थोरा- मोठ्यांनी आपले विचार व आचार आदर्शवत ठेवायला पाहिजेत. ज्या वेळी जी गोष्ट करणे आवश्यक आहे ती न केल्यास पश्चात्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे महापुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजेत.
कार्यक्रमाची सुरुवात अनिल लाखे यांनी गायलेल्या संत तुकारामांच्या अभंगाने झाली. वाड्मय मंडळाचे समन्वयक डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्तावित केले. डॉ. अमोल कवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती गौरी भोसले व धनश्री भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तर श्रीमती दीक्षा मोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल तायडे, पौर्णिमा गायकवाड, जितेंद्र चव्हाण, विशाल महांगडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
——————————
महान विभूतींचे विचार आचरणात आणणे काळाची गरज : श्रीधर साळुंखे
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
32
°
C
32
°
30.9
°
62 %
4.6kmh
100 %
Thu
30
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°

