Homeशैक्षणिक - उद्योग बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

• डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमधील एंडोक्राइनोलॉजीवर परिषद
कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा, मधुमेह, वाढीमधील समस्या तसेच हाडांशी संबंधित आजार आणि विविध अंतःस्रावी विकारांच्या (एंडोक्राइनोलॉजी) आधुनिक निदान व उपचारपद्धतींबाबत मार्गदर्शन करणारी वैद्यकीय परिषद व कार्यशाळा संपन्न झाली.
डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागातर्फे कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटना आणि अखिल भारतीय एंडोक्राइन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बाल व पौगंडावस्थेतील मुलांमधील विविध अंतःस्रावी ग्रंथींचे आजार, त्यांचे निदान, उपचार आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थापन यावर परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉ. वामन खाडिलकर, डॉ. अनुराधा खाडिलकर आणि डॉ. गणेश जवळेकर यांनी बालक व पौगंडावस्थेतील मुलांमधील विविध अंतःस्रावी विकारांवर मार्गदर्शन केले. वाढत्या लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, बालमधुमेह, मुलांची उंची व वाढीशी संबंधित विकार, तसेच हाडांचे आजार याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. या आजारांच्या प्रतिबंधासोबतच उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचारपद्धती आणि वैद्यकीय व्यवस्थापनातील नव्या दृष्टिकोनांवरही चर्चा झाली.
कार्यशाळेचे उदघाटन डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे ८० बालरोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. यावेळी कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी डॉ. विजय गावडे, डॉ. मिलिंद सदावर्ते आणि डॉ. रुचिका यादव, एंडोक्राइन विषयातील तज्ज्ञ डॉ. अनिकेत कुंभोजकर आणि डॉ. इशिता भौमिक यांची विशेष उपस्थिती होती.
संयोजन समिती प्रमुख आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी विभागातील डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. निगडे आणि डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30 ° C
30 °
29.9 °
70 %
4.6kmh
17 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page