Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ उत्साहात

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ उत्साहात

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६’ची महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. ‘नेटवर्क ट्रॅफिक डेटावरून एआय आधारित नेटवर्क हल्ल्याचा अंदाज’ या समस्येवरील प्रकल्पाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, तांत्रिक कौशल्याला आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ५८ विद्यार्थी संघांतील ३४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
डॉ. विनायक जी. पारले, डॉ. योगेश व्ही. चिमटे, यामीन एल. हकीम आणि प्रा. आरिफ ए. शेख यांनी स्पर्धेसाठी अंतर्गत ज्यूरी म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान व संशोधनाचा वापर करून विविध समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले. प्रकल्पांचे नावीन्य, व्यवहार्यता, तांत्रिक गुणवत्ता, सामाजिक उपयुक्तता, समस्या निराकरण क्षमता आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षण करण्यात आले.
प्रतीक दिलीप तुपे यांच्या नेतृत्वाखालील संघाने ‘नेटवर्क ट्रॅफिक डेटावरून एआय आधारित नेटवर्क हल्ल्याचा अंदाज’ या समस्येवरील प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. जयवर्धन संजय कांबळे यांच्या ‘स्मार्ट अक्सिडेट डिटेक्टर अँड इमर्जन्सी रीसपॉन्स’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक तर प्राची सुरेश पाटील यांच्या ‘एआय पावर्ड अंडरग्राउंड माईन सेफ्टी मॉनिटरिंग अँड रेस्क्यू सिस्टीम’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला. हे तिन्ही संघ राष्ट्रीय स्पर्धेच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. मन्नान फरास यांनी केली. सूत्रसंचालन सानिका इंगळे आणि लोचन गोसावी यांनी केले. सहायक रजिस्ट्रार जितेंद्र पोवार, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार तसेच विविध विभागप्रमुखांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30 ° C
30 °
29.9 °
70 %
4.6kmh
17 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page