• विवेकानंदच्या विद्यार्थ्यांचा ध्वनीप्रदूषणाविरोधात बिंदू चौकात एल्गार
कोल्हापूर :
‘डॉल्बीचा नाद, जेनझी बरबाद!’; ‘आवाज कमी कर डीजे, तुला आईची शपथ हाय!’; ‘अब की बार, डीजे हद्दपार!’ विद्यार्थ्यांच्या या भन्नाट आणि लक्षवेधी घोषणांनी बिंदू चौक परिसरात नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक ढंग, तरुणाईची भाषा आणि सामाजिक संदेश यांचा प्रभावी संगम साधत विद्यार्थ्यांनी ध्वनीप्रदूषणाविरोधातील जनजागृतीला वेगळाच रंग दिला. घोषणांचा आवाज घुमताच नागरिकांनीही कुतूहलाने विद्यार्थ्यांकडे पाहत या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सण-उत्सवांच्या काळात वाढणारा कर्णकर्कश आवाज आणि डॉल्बीच्या अतितीव्र ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने बिंदू चौक येथे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात जुना राजवाडा पोलीस ठाणे यांचेही सहकार्य लाभले.
‘डॉल्बीमुक्त आणि लेसर लाईटमुक्त कोल्हापूर’ हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक आणि लक्षवेधी घोषवाक्ये असलेले पोस्टर्स हातात घेऊन बिंदू चौक परिसरात जनजागृती केली. नागरिकांचे लक्ष वेधून घेत ध्वनी व प्रकाश प्रदूषणाच्या दुष्परिणामांविषयी संदेश दिला. ‘आतातरी व्हा जागे, नका जाऊ डीजेच्या मागे’, डॉल्बीचा ठोका, आरोग्याला धोका ‘डॉल्बीचा दणदणाट नको, निरोगी कोल्हापूर हवे’, ‘अब कि बार, डीजे हद्दपार’, ‘डॉल्बीचा नाद, जेनझी बरबाद’ अशा विविध घोषणांमधून विद्यार्थ्यांनी नागरिकांना जागरूक केले.
विवेकानंद कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाच्या पुढाकाराने मागील वर्षापासून डॉल्बी आणि लेसर लाईटच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भौतिकशास्त्रातील ध्वनी, वारंवारिता, तीव्रता, ध्वनीतरंग तसेच प्रकाश आणि लेसर यांसारख्या संकल्पनांचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडून विद्यार्थ्यांनी नागरिकांपर्यंत वैज्ञानिक पद्धतीने हा संदेश पोहोचविला.
यावेळी विभागप्रमुख प्रा. संजय एस. लट्टे यांनी डॉल्बीच्या अतितीव्र आवाजामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. गणेश जे. नवाथे यांनी ध्वनी आणि प्रकाश यांचा आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला.
या जनजागृती अभियानात भौतिकशास्त्र विभागातील डॉ. नम्रता नरेवाडीकर, प्रा. अविनाश आर. गायकवाड, प्रा. मयूर अंकलगी, प्रा. अमेय पाटील, प्रा. अनुरथ गोरे, प्रा.प्रज्ञा पाटील, प्रशांत पाटील, पुंडलिक हरेर, गणेश माने, पोलीस कर्मचारी अभिजीत परब, मनीषा काटकर, प्रियंका जनवाडे, निलेश नाझरे, योगेश राक्षे, विकास किर्लेकर, प्रतीक शिंदे, सावित्री पाटील, सविता पाटील, शितल कुंभार यांच्यासह भौतिकशास्त्र विभागातील अनेक विद्यार्थी सहभागी होते.
या अभियानास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक बी. टी. दांगट आणि प्रबंधक सचिन धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
‘डॉल्बीचा नाद, जेनझी बरबाद’
Mumbai
few clouds
30
°
C
30
°
29.9
°
70 %
4.6kmh
17 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°

