कोल्हापूर :
उच्च माध्यमिक स्तरावरील अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात शिक्षकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ यांच्यावतीने टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनास कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसंदर्भात शिक्षण संचालनालयाने शासनाकडे सादर केलेला प्रस्तावित मसुदा अन्यायकारक आहे. या मसुद्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील सुमारे ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असून अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या सेवासुरक्षेबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारे निकष तातडीने रद्द करून प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करावी, अशी जोरदार मागणी शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी केली.
या आंदोलनात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सहसचिव दिलीप शितोळे, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे सचिव गोविंद वाघ, बापू दाभाडे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब बागडी, सातारा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश भिसे, अभिजीत दुर्गी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा विभागप्रमुख शशिकांत काटे, सांगली सहविभागप्रमुख प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रकाश हाके, प्रा. रवी जाधव, हितेंद्र साळुंखे हे उपस्थित होते.
——————————
अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
89 %
3.6kmh
40 %
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

