कोल्हापूर :
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन च्यावतीने कर्नाटकातील बेंगळुरू येथे २५ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ज्युनियर बॉईज राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी (डॉ. बी.सी. रॉय ट्रॉफी २०२६-२७, टियर-१) महाराष्ट्र राज्य संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात कोल्हापूरच्या अदिराज नेत्रपाल जाधव याची निवड झाली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन च्यावतीने मुंबईतील कुपरेज येथे गेल्या १२ दिवसांपासून निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून महाराष्ट्राच्या ज्युनियर बॉईज संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) च्यावतीने पाठविण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अदिराजसह चार खेळाडूंची निवड झाली होती. त्यापैकी अदिराजची महाराष्ट्राच्या अंतिम संघात निवड झाली. अदिराज हा संजीवनी पब्लिक स्कूल, पन्हाळा येथे शिक्षण घेत असून, बेंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्रासह कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार आहे.
केएसए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक प्रदीप साळोखे, योगेश सरनाईक व शरद मेढे यांनी निवड चाचणीचे कामकाज पाहिले.
अदिराजला केएसएचे पेट्रन-इन-चीफ श्री. शाहू छत्रपती महाराज, पेट्रन मेंबर संभाजीराजे छत्रपती, केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, तसेच सौ. मधुरिमाराजे छत्रपती, ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे मार्गदर्शन, सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
——————————
अदिराज जाधव याची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29
°
C
29
°
29
°
74 %
3.6kmh
35 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
27
°

