कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने “राखी विथ खाकी” उपक्रमांतर्गत कोडोली पोलिस ठाण्यात विद्यार्थिनीकडून रक्षाबंधन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधत कर्तव्यनिष्ठ खाकी वर्दीप्रती कृतज्ञता, सन्मान आणि बंधुभाव व्यक्त करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन सुरेश मसुटगे यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले, शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येक मुलीच्या अडचणी आम्हाला समजतात. कोडोली पोलीस ठाणे हे तुमचा हक्काचा मोठा भाऊ आहे. कोणत्याही संकटाच्या किंवा अडचणीच्या वेळी माता-भगिनींच्या संरक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.
यावेळी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक अभिजित संजय शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आशुतोष मधुकर पाटील, प्रा. पूनम खाडे, प्रा. नामदेव पाटील, प्रा. श्रावणी गिरीगोसावी आदी उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थिनींकडून कोडोली पोलिसांना राखी
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
4.6kmh
34 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

