Homeसण - उत्सवगणेशमूर्ती बुकिंगसाठी गर्दी

गणेशमूर्ती बुकिंगसाठी गर्दी

• पारंपरिक मूर्तींसह विविध देवदेवतांच्या रूपातील गणेशमूर्तींना विशेष मागणी
कोल्हापूर :
श्रावणापासूनच गणेशभक्तांना लाडक्या गणरायाच्या आगमनाची ओढ लागलेली असते. यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी असून त्यादिवशी लाडक्या गणरायाचे वाजतगाजत आगमन होईल. अबालवृद्धांचा आवडता गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर आल्याने घरोघरी तयारीला वेग आला आहे. घरगुती गणेशमूर्ती निश्चित करण्यासाठी नागरिक सहकुटुंब कुंभार गल्ल्यांसह शहरातील विविध स्टॉलवर भेट देत आहेत. आपल्या पसंतीची मूर्ती बुक करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
शहरातील धोत्री गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली, गंगावेश, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प यासह शहर व उपनगरांमध्ये गणेशमूर्तींचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या आकर्षक रंगकामातील मूर्तींसोबत मुंबई, पुणे व पेण येथून आणलेल्या विविध आकारातील मूर्तीही गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बैठी गणेशमूर्ती, सिंहासनावरील गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, पोटल्या गणपती, लालबागचा राजा, चिंतामणी यांसह उंदरावरील गणेश, मयूरारूढ गणेश, कमळातील गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातील गणेशमूर्तींना यंदा विशेष मागणी आहे.
याशिवाय श्रीदत्त, श्रीकृष्ण, श्रीशंकर, श्रीविठ्ठल, स्वामी समर्थ, सद्गुरू बाळूमामा, जेजुरीचा खंडोबा आदी देवदेवतांच्या रूपातील गणेशमूर्तीही भक्तांच्या पसंतीस उतरत आहेत. कुटुंबातील सर्वांच्या पसंतीने मूर्ती निश्चित करून तिचे बुकिंग करण्यासाठी स्टॉलवर गर्दी वाढत असून, गणेशोत्सवाची चाहूल शहरात सर्वत्र जाणवू लागली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
4.6kmh
34 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page