Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा शुभारंभ

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा शुभारंभ

कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भारतातील व्यवस्थापन शिक्षणातील समकालीन मुद्दे” या विषयावरील सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उदघाटन आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांच्याहस्ते झाले. देशभरातील विविध विद्यापीठे, व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव तथा सह-संयोजक प्रा. डॉ. जयेंद्र खोत होते. यावेळी संयोजक व स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा. डॉ. मुरली भूपती, प्रा. डॉ. परिमला वेलुवली, प्रा. डॉ. गायत्री हरिश आणि प्रा. डॉ. अण्णासाहेब गुरव, डॉ. शुभांगी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. मुरली भूपती यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि सहा दिवसांत होणाऱ्या विविध तांत्रिक सत्रांबाबत माहिती दिली. डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योगाभिमुख शिक्षणाच्या बदलत्या युगात शिक्षकांनी सातत्याने अद्ययावत राहण्याची गरज अधोरेखित केली. प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व्यवस्थापन शिक्षणात नावीन्यपूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
तांत्रिक सत्रात प्रा. डॉ. परिमला वेलुवली यांनी व्यवस्थापन शिक्षणातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांसह जागतिक गुणवत्तेच्या निकषांवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. गायत्री हरिश यांनी बी-स्कूल्ससमोरील संधी आणि आव्हानांचा परामर्श घेत बदलत्या शैक्षणिक वातावरणाचा वेध घेतला.
यावेळी ‘उद्योग–शैक्षणिक संस्था समन्वय आणि नियोक्त्यांच्या अपेक्षित कौशल्यांतील दरी कमी करणे’ या विषयावर  प्रा. डॉ. अण्णासाहेब गुरव यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या परिसंवादात विरेंद्र पाटील, प्रा. डॉ. मुरली भूपथी, प्रा. डॉ. अनिल गायकवाड आणि निशा चैनानी यांनी उद्योग–शैक्षणिक दुवा, रोजगाराभिमुख कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटर्नशिप आणि उद्योगसहभाग या विषयांवर मार्गदर्शन केले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती व विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.2 ° C
27.2 °
27.2 °
89 %
10.7kmh
100 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page