Homeइतरराष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटीमध्ये 'विद्युत सुरक्षा' विषयावर कार्यशाळा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटीमध्ये ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर :
राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी, कोल्हापूरच्या इलेक्ट्रिकल विभागात विद्यार्थ्यांसाठी “विद्युत सुरक्षा” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महावितरण, हुपरी उपविभागाचे डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर रोहित कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत श्री. कुलकर्णी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला विजेच्या सुरक्षित वापराबाबत मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांकडून विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली तसेच महावितरणतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले माहितीपत्रक व सादरीकरण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजेचा शॉक लागून घडलेल्या दुर्दैवी घटनांचा आढावा घेण्यात आला. अशा घटना घडण्यामागील कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच विजेचा शॉक लागल्यानंतर तातडीने द्यावयाचे प्राथमिक उपचार याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
औद्योगिक तसेच घरगुती विद्युत वायरिंग, मीटर तपासणी, अर्थिक यांची नियमित तपासणी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याशिवाय वीज चोरी, वीज गळती, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी आवश्यक काळजी, तसेच ऊर्जा बचतीच्या विविध उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील पदविका व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध सौरऊर्जा योजनांची माहिती देऊन सौरऊर्जा उपकरणांचे उत्पादन, वितरण आणि उद्योजकतेच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.
ही कार्यशाळा महावितरण व एनआयटी, कोल्हापूर यांच्यातील शैक्षणिक करारांतर्गत आयोजित करण्यात आली. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश काकडे, सहाय्यक अभियंता संदीप काकडे आणि सहाय्यक अभियंता सचिन दळवी (उंचगाव, हुपरी उपविभाग) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी तज्ज्ञांचा परिचय करून दिला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वप्निल पाटील, ओमकार खोत, दिग्विजय शिंदे आणि मयूर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे तसेच अधिष्ठाता संदीप पंडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.8 ° C
27.8 °
27.8 °
81 %
7.8kmh
94 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page