• भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडून प्रस्ताव
कोल्हापूर :
कोल्हापुरातील खेळाडूंना कुस्ती, फुटबॉलनंतर ॲथलेटिक्स गेमच्या विकासासाठी झगडावे लागत आहे. या खेळाडूंना ॲथलेटिक्ससाठी एकाच छताखाली विविध खेळांच्या मैदानाची उपलब्धता करून देण्याच्या उद्देशाने भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी १० कोटी रूपये निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. शनिवारी कोल्हापूर दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० कोटी निधीच्या मागणीचा प्रस्ताव कृष्णराज महाडिक यांच्याकडून देण्यात आला. लवकरच यावर बैठक घेवून, निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
कोल्हापुरातील ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंना पाठबळाची गरज आहे. एकाच ठिकाणी जलतरण, फुटबॉल, हेल्थ झोन यासह विविध मैदानांचा आणि खेळांचा विकास साधण्यासाठी निधीची गरज आहे. कोल्हापुरातील टाकाळा परिसरात भिमा हेल्थ झोन या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकमेव जलतरण तलाव आहे. या तलावाचा विकास, त्याच्या बाजुला असलेल्या फुटबॉल मैदानाचा विकास आणि याच कॅम्पसमध्ये असलेल्या व्यायाम शाळेचा विकास, यासह अन्य खेळांच्या विकासासाठी निधीची तरतुद करता येवू शकते. याबाबत भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूर दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून १० कोटी रूपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव दिला. यावर मुंबईत बैठक घेवून, कोल्हापूरच्या ॲथलेटिक्स विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
——————————
भिमा हेल्थ झोनच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० कोटी निधीची मागणी
Mumbai
overcast clouds
27.8
°
C
27.8
°
27.8
°
81 %
7.8kmh
94 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

