Homeकला - क्रीडाआंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

कोल्हापूर :
जिल्हा प्रशासन, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, माय भारत व सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी केलेली योगाची प्रात्यक्षिके तसेच पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त विजेता रोहित चव्हाण, १७ वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या रोहिणी देवबा व हर्षवर्धन पाटील, इनरव्हिल क्लब आयोजित योगा स्पर्धेत प्रथम क्रमांकासह योगा क्विन पुरस्कार प्राप्त गंधाली खोपकर आदी खेळाडूंचा तर रविभुषण कुमठेकर व संदीप पाटील या योग मार्गदर्शकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपूर्ण जगभर २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात योग ही काळाची गरज बनली आहे. योगामुळे केवळ शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर मानसिक सकारात्मक विचार व निरोगी जीवनशैली विकसित होण्यास मदत होते.
याप्रसंगी जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानाची शपथ घेण्यात आली. ही शपथ प्रा. डॉ. श्वेता पुरुळेकर यांनी दिली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या योग दिनासाठी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, तालुका क्रीडा अधिकारी एल. जी. पवार, सुधाकर जमादार, मनिषा पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, रोहिणी मोकाशी, स्नेहल जगताप-पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिमा पाटील, माय भारतचे निलेश कांबळे, हॉकी प्रशिक्षक सागर जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
63 %
3.4kmh
18 %
Thu
31 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
32 °
Mon
30 °

Most Popular

You cannot copy content of this page