कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग तज्ज्ञ अश्विन कुमार यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व विशद केले. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये योग हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा प्रभावी मार्ग आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत होते तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
अश्विन कुमार यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान पद्धतींचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच योग व प्राणायाम यांचे महत्व सांगितले.
योग प्रात्यक्षिक आणि ध्यान सत्रादरम्यान सर्व रा.स.यो.चे स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रा. केदार रेडेकर व विनोद उतळे यांनी आयोजन केले. सूत्रसंचालन प्रा. सुरज पावसकर यांनी केले. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, टेक्निकल कॅम्पस पदविकाच्या उप प्राचार्या के. एम. पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28
°
C
28
°
28
°
83 %
1.5kmh
5 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

