Homeसामाजिकसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन बायपास मायक्रोव्हॅस्क्युलर कार्यशाळा

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन बायपास मायक्रोव्हॅस्क्युलर कार्यशाळा

• २० न्यूरोसर्जन्स आणि आफ्रिकेतील तज्ज्ञाचा सहभाग
कोल्हापूर :
कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे १३ व १४ जून रोजी ब्रेन बायपास मायक्रोव्हॅस्क्युलर कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली, अशी माहिती न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. प्रकाश भारमागौडर, डॉ. प्रतिमा मारजक्के उपस्थित होते.
सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मेडिकल डायरेक्टर व प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांनी सांगितले की, श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन झाले. न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही भारतातील निरोसर्जनची शिखर संघटना असून, त्यांच्या विद्यमाने झालेल्या या कार्यशाळेत देशातील विविध राज्यांमधून आलेल्या २० न्यूरोसर्जन्स सह आफ्रिका खंडातील एका न्यूरोसर्जनने सहभाग नोंदविला. त्यामुळे या कार्यशाळेला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
ब्रेन बायपास अर्थात मायक्रोव्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस ही न्यूरोसर्जरीतील सर्वात क्लिष्ट शस्त्रक्रिया आहे. आजवर ती फक्त महानगरांतील मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांपुरती मर्यादित होती. या कार्यशाळेत डॉ. प्रा. द्वारकानाथ श्रीनिवास, माजी विभाग प्रमुख, निम्हान्स बंगळूर आणि डॉ. बटुक दियोरा, विभाग प्रमुख, सायन रुग्णालय मुंबई यांच्यासह जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांनी भारतातील विविध भागांतील न्यूरोसर्जन आणि आफ्रिकेतील प्रतिनिधीला सिलिकॉन ट्यूब व धमनी मॉडेलवर ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले. प्रतिनिधींच्या प्रॅक्टिससाठी १८ न्यूरोसर्जरी मायक्रोस्कोप उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रत्येकाला स्वतंत्र मायक्रोस्कोप दिला गेला. ब्रेन बायपास म्हणजे १ मिलीमीटरपेक्षा कमी व्यासाच्या दोन धमन्या जोडून आजारी धमनीच्या पलीकडे रक्तप्रवाह वळवण्याची प्रक्रिया आहे.
कार्यशाळेच्या यशस्वी समारोपानंतर दि. १५ जूनला सहभागी न्यूरोसर्जन्ससाठी एक विशेष शैक्षणिक सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये मोया-मोया या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या आजारावर करण्यात आलेल्या ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. देश-विदेशातून आलेल्या न्यूरोसर्जन्सनी या लाईव्ह सर्जरीचे बारकाईने निरीक्षण करत ब्रेन बायपास सर्जरीतील प्रत्येक टप्पा, मायक्रोव्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस तंत्र आणि रिव्हॅस्क्युलरायझेशन प्रक्रियेची सखोल माहिती घेतली. प्रत्यक्ष रुग्णावरील शस्त्रक्रियेचे निरीक्षण करण्याची संधी मिळाल्याने सहभागी डॉक्टरांनी या उपक्रमाचे विशेष स्वागत केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
5 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page