कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदेच्या ग्रामीण कृषी जागरूकता अभियान अंतर्गत करवीर व हातकणंगले तालुक्यातील १० गावांमध्ये महाराष्ट्र कृषी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदूत आणि कृषिकन्यांनी आधुनिक, पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीचा संदेश ग्रामीण भागात पोहोचविला.
यावेळी विविध गावांत वृक्षदिंडी, प्रभातफेरी आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. “शेती वाचवा, माती जपा”, “पाणी वाचवा”, “सेंद्रिय शेती ही काळाची गरज” अशा घोषणांसह विद्यार्थ्यांनी आकर्षक फलकांच्या माध्यमातून मृदा संवर्धन, जलसंधारण आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून रासायनिक खतांच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, जमिनीची घटती सुपीकता, पाण्याचा अपव्यय आणि सेंद्रिय शेतीचे फायदे प्रभावीपणे मांडण्यात आले. या उपक्रमाला शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर कृषीदूतांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत माती परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनासाठी सीडबॉल (बीजगोळा) तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना सीडबॉलचे मोफत वितरणही करण्यात आले.
ग्रामीण भागातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी शालेय मुलांमध्ये शेती, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले.
महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अकॅडमिक प्रमुख प्रा. आर. आर. पाटील, ‘रावे’ कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. श्वेता मयेकर यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डी. एन. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
——————————
डी. वाय. पाटील कृषीच्या विद्यार्थ्यांकडून १० गावांत आधुनिक, शाश्वत शेतीचा जागर
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
28.9
°
79 %
6.2kmh
24 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

