Homeकला - क्रीडास्वप्नील कदम व महेश पाटील यांची महाराष्ट्र संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये निवड

स्वप्नील कदम व महेश पाटील यांची महाराष्ट्र संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये निवड

कोल्हापूर :
नुकत्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्यातर्फे सन २०२६-२७ या हंगामासाठी विविध निवड समितीची एमसीएकडुन नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरचे स्वप्नील कदम व महेश पाटील यांची महाराष्ट्र रणजी संघाच्या सपोर्ट स्टाफ दी निवड झाली आहे.
बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणा­ऱ्या मुस्ताक अली टी-२० ट्राॅफी, विजय हजारे एकदिवशीय ट्राॅफी व रणजी स्पर्धेच्या महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषक (परफाॅर्मन्स व्हीडीओ ॲनॅलीस्ट) साठी कोल्हापूरच्या स्वप्नील कदमची एमसीए मार्फत फेरनिवड झाली आहे
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा माजी खेळाडू महेश पाटील यांची महाराष्ट्र रणजी ट्राॅफी संघाच्या सपोर्ट स्टाफ (स्ट्रेंथ ॲण्ड कंडिशन प्रशिक्षक) मध्ये निवड झाली आहे. या दोघांची सलग तिसऱ्यावर्षी फेरनिवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या रणजी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोल्हापूरच्या दोघांची निवड झाल्यामुळे कोल्हापूरच्या क्रिकेटसाठी अभिमानाची व कौतुकाची गोष्ट ठरली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
28.9 °
79 %
6.2kmh
24 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page