• मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ
कोल्हापूर :
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय सावकारे, मंत्री मकरंद पाटील, कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. कार्यक्रमास राज्य शासनातील मंत्री, खासदार, आमदार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
——————————
श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शुभारंभ
Mumbai
clear sky
28
°
C
28
°
28
°
83 %
1.5kmh
5 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

