कोल्हापूर :
संभाव्य पूर व नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव मंडळामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) टीम-५ई तर्फे समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
तहसीलदार माधवी शिंदे (पन्हाळा) तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ग्रामस्थांना पूर, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, स्वतःची व इतरांची सुरक्षितता तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गावातील इच्छुक युवकांना बोट हाताळणी, लाईफ जॅकेटचा योग्य वापर, बचावकार्याची प्राथमिक तंत्रे तसेच आपत्तीच्या काळात स्थानिक पातळीवर प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. आपत्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक स्वयंसेवक सक्षमपणे मदत करू शकतील, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास एनडीआरएफ टीम-५ई चे कमांडर इन्स्पेक्टर महेश शिंदे, इन्स्पेक्टर अजय यादव यांच्यासह संपूर्ण एनडीआरएफ पथक उपस्थित होते. तसेच मंडळ अधिकारी नलिनी मोहिते, मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
——————————
बाजार भोगाव येथे एनडीआरएफकडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षण
Mumbai
light rain
29
°
C
29
°
28.9
°
79 %
5.7kmh
94 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

