Homeकला - क्रीडाआशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या गौरव पाटीलचा खा. महाडिक यांच्याकडून सत्कार

आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या गौरव पाटीलचा खा. महाडिक यांच्याकडून सत्कार

कोल्हापूर :
थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावलेल्या कोपार्डे गावचा पैलवान गौरव पाटील याचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
करवीर तालुक्यातील कोपार्डे गावचा पैलवान आणि सेना केसरी पैलवान गौरव पाटील हा कोपार्डेच्या कुस्ती संकुल केंद्रात सराव करतो. गौरव पाटील याने थायलंडमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ७५ किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणार्‍या पैलवान गौरवचे कुस्तीप्रेमींसह विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पैलवान गौरवचा रविवारी सत्कार करण्यात आला.
मेहनत, चिकाटी आणि अखंड देशप्रेमाच्या जोरावर मिळवलेले गौरवचे यश केवळ कोपार्डे गावाचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचवणारं आहे. गौरवने आणखी यश संपादन करावे, यासाठी महाडिक परिवार त्याच्या पाठीशी असेल, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले.
यावेळी पैलवान गुंडाजी पाटील, मारुती ऊर्फ बट्टू जाधव, बाबा शिरगांवकर, प्रा. सिकंदर कांबळे, अथर्व पाटील, समर्थ शिरगांवकर, राजू सूर्यवंशी, सर्वेश कांबळे, समर वाडेकर, शंतनू खोमडे, आर्यन मांडवे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30 ° C
30 °
29.9 °
74 %
5.1kmh
83 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page