Homeकला - क्रीडाबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कायरा, विहान, शरयू, सोयरा, अभिक, स्वरीत यांना दुहेरी मुकुट  

बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कायरा, विहान, शरयू, सोयरा, अभिक, स्वरीत यांना दुहेरी मुकुट  

कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना यांच्या वतीने व पीएनजीएस गार्गी, अमनोरा यांच्या सहकार्याने आयोजित योनेक्स सनराईज जीएच रायसोनी मेमोरियल डिस्ट्रिक्ट सुपर 1000 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कायरा रैना, विहान कोल्हाडे, शरयू रांजणे, सोयरा शेलार,  अभिक शर्मा, स्वरीत सातपुते यांनी दुहेरी मुकुट संपादन केला.
पीइ सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 15 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित कायरा रैना हिने तिसऱ्या मानांकित ख्याती कत्रेचा 15-07, 15-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याच मुलांच्या गटात अंतिम लढतीत अकराव्या मानांकित विहान कोल्हाडेने तिसऱ्या मानांकित हृदान पाडवेचा 09-15, 15-07, 15-12 असा कडवा प्रतिकार करत विजेतेपद पटकावले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित एल. अभिग्यान सिंघा याने कपिल जगदाळेचा 08-15, 15-08, 15-08 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. मुलींच्या गटात कायरा रैना हिने अव्वल मानांकित समन्वया धनंजयचा 15-08, 12-15, 15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
19 वर्षाखालील मुलांच्या गटात आठव्या मानांकित निक्षेप कत्रेने सातव्या मानांकित सार्थक पाटणकरचा 15-08, 15-03 असा तर, मुलींच्या गटात बिगर मानांकित युतिका चव्हाणने पाचव्या मानांकित नव्या रांकाचा 15-13, 15-12 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुष गटात दहाव्या मानांकित ऋषभ देशपांडेने चौथ्या मानांकित अवधूत कदमचा 15-06, 15-09 असा तर, महिला गटात सहाव्या मानांकित  साद धर्माधिकारी हिने श्रेया भोसलेचा 15-09, 15-16 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
दुहेरीत 15 वर्षांवरील मुलांच्या गटात हृदान पाडवे व विहान कोल्हाडे या तिसऱ्या मानांकित जोडीने जतिन सराफ व खुश दिक्षित यांचा 15-09, 15-05 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अभिक शर्माने स्वरीत सातपुतेच्या साथीत अवनीश बांगर व आयांश यारागट्टी यांचा 15-06, 15-06 असा तर, मुलींच्या गटात  शरयू रांजणे व सोयरा शेलार यांनी दुसऱ्या मानांकित ख्याती कत्रे व शर्वरी सुरवसे यांचा 15-13, 15-07 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात अभिक शर्मा व स्वरीत सातपुते या तिसऱ्या मानांकित जोडीने अवधूत कदम व ओजस जोशी यांचा  18-20, 15-13, 15-13 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. याच मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित शरयू रांजणे व सोयरा शेलार यांनी चौथ्या मानांकित नव्या रांका व श्रेया चौधरी यांचा  15-05, 15-05 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जीएच रायसोनी स्किल टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रवींद्र खराडकर, पीडीएमबीएचे उपाध्यक्ष शशांक हळबे, खजिनदार सारंग लागू, सह सचिव आनंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव राजीव बाग, नीलकंठ कुलकर्णी, प्रसाद परळीकर, अनिरुद्ध जोशी, अंजली लागू उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page