Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातर्फे भुये येथे ‘खेती बचाओ’ अभियान उत्साहात 

डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातर्फे भुये येथे ‘खेती बचाओ’ अभियान उत्साहात 

• शास्त्रज्ञ डॉ. मनोज पुनियानी साधला शेतकऱ्यांशी संवाद
कोल्हापूर :
रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज पुनिया यांनी केले. भुये येथे आयोजित ‘खेती बचाओ अभियान’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्यावतीने भुये येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व कृषिकन्या, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, डिजिटल खेती आणि चिपकू ट्रॅप यांच्या संयुक्त विद्यमाने भुये (ता. करवीर) येथे हे अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत शेतकरी संवाद, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने तसेच विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. माती परीक्षणाचे महत्त्व, रासायनिक खतांचा संतु‌लित वापर, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतांची निर्मिती, जीवामृताचा वापर तसेच रोग व किड व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भारतीय कृषी संशोधन परिषदचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मनोज पुनिया, बिझनेस एक्झिक्युटिव्ह अमोल निंबाळकर, कृषी अधिकारी (भुये) सौ. दीपाली सुतार, डिजिटल खेतीचे संचालक विजय सांगळे,  चिपकूचे संचालक सुनील गायकवाड, सरपंच मालिनी पाटील भुयेकर, उपसरपंच कुलदीप पाटील भुयेकर, विक्रम पाटील, आश्लेष खाडे, सुभाष पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील व पदाधिकारी व शेतकरी  उपस्थित होते.
नियोजन प्राचार्य डी. एन. शेलार, शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे,  कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने कृषीकन्या वैष्णवी साने, रिया देसाई, शिवनेरी शिंदे, वैष्णवी रावळ आणि वैदेही सुर्वे यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
68 %
4.1kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page