Homeइतरमहाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त साखरतर्फे नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त साखरतर्फे नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन

• प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान
कोल्हापूर :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संचालकांकडून कारखाना कार्यक्षेत्रातील नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन देवून प्रगत, प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला.
शेतकऱ्यांनी शेतीमध्ये राबविलेल्या नाविन्यपूर्ण, आधुनिक व आदर्श उपक्रमांची प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. शिरोळ येथे उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस उत्पादन वाढीच्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच इतर पिकांचे उत्पादन कशा पद्धतीने घेता येते आणि उत्पादन वाढ करता येते याची माहिती दिली. सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, सुपर केन नर्सरीचे प्रयोग, खत, पाणी व वेळेचे नियोजन, व्यवस्थापन आदींची सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांकडून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संचालक दरगु गावडे, धनाजी पाटील नरदेकर, पंडित काळे, बापूसो गंगाधर, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील उपस्थित होते.
कवठेगुलंदचे युवा शेतकरी अविनाश कदम यांचा सत्कार श्री दत्त कारखान्याचे संचालक भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दत्त कारखाना अधिकारी, कर्मचारी व इतर शेतकरी उपस्थित होते.
औरवाड येथील शेतकरी चंद्रकांत गावडे यांच्या शेतीप्लॉट वर कृषी दिन साजरा करण्यात आला. संजय कोल्हे यांच्या ८६०३२ प्लॉट ला भेट दिली. यडूरवाडी येथील शेतकरी राजू दत्ता माने व मुलगा शिवराज माने यांच्या उसाच्या ६० गुंठे ८६०३२ या प्लॉटला भेट देण्यात आली. यावेळी संचालक अमर यादव व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान केला.
बेडकिहाळ येथील अशोक सुभेदार यांच्या प्लॉटवर कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संचालक इंद्रजीत पाटील, आप्पासाहेब पाटील व भागातील सर्व शेतकरी उपस्थित होते. संचालक शेखर कलगोंडा पाटील यांनी नांदणी, हरोली, जांभळी, धरणगुती (ता. शिरोळ) येथील प्रगतशील शेतकरी व चांगले ऊस पिकवणारे शेतकरी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व आलेल्या सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत केले.
विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात श्री दत्त उद्योग समूहाचे संचालक तसेच शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना प्रोत्साहन, प्रेरणा दिली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.8 ° C
27.8 °
27.8 °
81 %
7.8kmh
94 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page