कोल्हापूर :
एसएएस स्पोर्ट्स मॅनेजमेंट च्यावतीने आयोजित दुसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या मनीषा प्रधान, मुंबई शहरच्या राजेश्वरी मेहेत्रे, पुण्याच्या रंजना पत्की यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
कोल्हापूर येथील आनंद भवन हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 60 वर्षांवरील महिला गटात अंतिम फेरीत ठाण्याच्या मनीषा प्रधान हिने नाशिकच्या स्वाती आगरकरचा 8-11, 11-9, 9-11, 12-10, 16-14 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
65 वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत मुंबई शहरच्या अव्वल मानांकित राजेश्वरी मेहेत्रे हिने पुण्याच्या दुसऱ्या मानांकित सुहासिनी बाकरेचा 11-8, 11-8, 9-11, 9-11, 11-4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 70 ते 75 वर्षांवरील महिला गटात अंतिम सामन्यात पुण्याच्या रंजना पत्की हिने ठाण्याच्या मैथिली सोधीचा11-8, 6-11, 11-4, 11-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
राज्य मानांकन मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत राजेश्वरी मेहेत्रे, रंजना पत्की, मनीषा प्रधान यांना विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
5.7kmh
100 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

