Homeशैक्षणिक - उद्योग संजय घोडावत फाउंडेशनकडून एचआयव्हीग्रस्तांना मदत

संजय घोडावत फाउंडेशनकडून एचआयव्हीग्रस्तांना मदत

कोल्हापूर :
एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशन, पोषण आणि पुनर्वसनासाठी गेली २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या लोटस मेडिकल फाउंडेशनच्या पीपीपी-एआरटी (पब्लिक प्रायव्हेट – पार्टनरशिप अँटीरेट्रोव्हायरल थेरपी) सेंटरला संजय घोडावत फाउंडेशनतर्फे आर्थिक सहाय्य देण्यात आले. हा कार्यक्रम लोटस मेडिकल फाउंडेशन येथे उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते झाला.
यावेळी संजय घोडावत यांनी लोटस मेडिकल फाउंडेशनच्या उषा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. एचआयव्हीग्रस्त रुग्णांना सन्मानाने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी संस्था सातत्याने करत असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी व रुग्णांसाठी दरमहा आर्थिक सहाय्य देणार असल्याची घोषणा केली.
लोटस मेडिकल फाउंडेशनच्या पीपीपी-एआरटी सेंटरमार्फत सध्या १,२०० हून अधिक एचआयव्ही बाधित रुग्णांना नियमित औषधोपचार, समुपदेशन, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, पोषण मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा दिली जाते. संजय घोडावत फाउंडेशनच्या आर्थिक सहाय्यामुळे या सेवा अधिक सक्षम व परिणामकारक होणार असून रुग्णांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमात उद्योगसमूह आणि स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून उभ्या राहणाऱ्या सहकार्याचे महत्त्व संजय घोडावत यांनी अधोरेखित केले. एचआयव्हीग्रस्त व्यक्तींना भेदभावमुक्त, सन्मानपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगसमूह यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लोटस मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शहा यांनी संजय घोडावत फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी लोटस मेडिकल फाउंडेशनचे  रमाकांत भिंगार्डे, सुनील गुंडाळे, मार्गदर्शक डॉ. निरंजन शहा, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी साठे, यतीश शहा, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, समुपदेशक उपस्थित होते. तसेच संजय घोडावत संस्थेचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, प्रिन्सिपल डॉ. विराट गिरी व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29.6 ° C
29.6 °
29.6 °
54 %
5kmh
24 %
Wed
30 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page