कोल्हापूर :
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा कॅडेट सार्थक दत्तात्रय डेरे याची भारतीय नौदलात निवड झाली आहे.
कॅडेट सार्थक डेरे याने एनसीसीमध्ये प्रशिक्षण घेत असताना तो विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता. चिकाटी, मेहनत व नेतृत्वगुणांच्या बळावर त्याची भारतीय नौदलात निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
तसेच आदित्य तुळशीदास वाडकर या कॅडेटने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुजरात येथील राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी येथे NIELIT Organisation च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सायबर डिफेंडर कॅम्पमध्ये त्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कॅम्पमध्ये त्याला सायबर सिक्युरिटीची मूलभूत तत्वे, लिरिक्स ऑपरेटिंग सिस्टम, मोबाईल सिक्युरिटी, तसेच विविध साधनांचे प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच आदित्य विजय गुरव या कॅडेटने हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटन अँड अलाईट स्पोर्ट्स अंतर्गत रिजनल वॉटर स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर पोंग डॅम येथील विशेष जलक्रीडा प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.
या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य गुरुनाथ फगरे आणि एन.सी.सी. अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ. विनोद वीर, २२ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. साताराचे कंमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले, ॲडमिनिस्ट्रॅटिव्ह ऑफिसर लेफ्टनंन्ट कर्नल आनंद सिंग, सुभेदार मेजर हिरेमठ, महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व शिशकेतर सेवक यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————
किसन वीर महाविद्यालयाच्या सार्थक डेरे याची भारतीय नौदलात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30
°
C
30
°
29.9
°
74 %
5.1kmh
83 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

