Homeकला - क्रीडावर्षाविश्वास आणि मर्दानी खेळाचा आखाडा

वर्षाविश्वास आणि मर्दानी खेळाचा आखाडा

वरिष्ठ गटासाठी पात्र
कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए ‘ब’ गट फुटबॉल लीग स्पर्धेत वर्षाविश्वास तरुण मंडळ विजेता तर मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ उपविजेता ठरले. आता हे दोन्ही संघ वरिष्ठ गट (‘अ’ गट)साठी पात्र ठरले आहेत.
केएसए ‘ब’ गट सुपरलीगमधील शेवटचे दोन सामने पार पडले. त्यामध्ये
पहिल्या सामन्यात मर्दानी खेळाचा आखाडा संघाने २ विरूध्द १ गोलफरकाने बावडा फुटबॉल क्लब संघाचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात वर्षाविश्वास तरुण मंडळने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर १-०ने विजय मिळवला. गुणतालिकेत वर्षा विश्वास तरुण मंडळने सर्वाधिक ९ गुण मिळवून विजेतेपद प्राप्त केले. तसेच मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळने ६ गुणांसह उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाला. विजेत्या व उपविजेत्या संघास कायमस्वरूपी चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी केएसएचे पदाधिकारी माणिक मंडलिक, अमर सासने, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी व कार्यकारणी सदस्य संभाजीराव पाटील मांगोरे, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे व सामना निरीक्षक राजेंद्र राऊत व पंच उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
51 %
2.1kmh
42 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
27 °

Most Popular

You cannot copy content of this page