Homeइतरभिमा कृषी प्रदर्शनात मोफत झुणका-भाकरी वाटप

भिमा कृषी प्रदर्शनात मोफत झुणका-भाकरी वाटप

कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटप करण्यात आले. ही झुणका-भाकरी खाऊन शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक तृप्त झाले. भिमा कृषी व पशु प्रदर्शन मेरी वेदर मैदान येथे सुरू आहे.
भिमा कृषी प्रदर्शनाला भेट देणार्‍या शेतकरी आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या शेतकर्‍यांना प्रदर्शनात कृषी विषयक तंत्रज्ञान आणि नवनवीन माहिती तर मिळत आहे. शिवाय शेतकर्‍यांना झुणका भाकरी मोफत मिळत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. सुमारे ५ हजार शेतकर्‍यांनी झुणका-भाकरीचा लाभ घेतला.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून भिमा कृषी प्रदर्शनाकडे पाहिलं जाते. कृषी तंत्रज्ञान, नवनवीन औजारे, पशूपक्षी, जनावरे यामुळे हे प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरत आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या शेतकरी आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, प्रदर्शनकाळात दरवर्षी मोफत झुणका-भाकरी वाटप करण्यात येते. शनिवारी दुपारी भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथील नवज्योत महिला बचत गटाच्यावतीने झुणका-भाकरीचे वाटप करण्यात आले. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, मंगलताई महाडिक, शकुंतला महाडिक, साधना महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. त्याचा शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि नागरिकांनी येथेच्छ आस्वाद घेतला.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page