कोल्हापूर :
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात सायन्स शाखा, संशोधन व विकास कक्ष आणि अंतर्गत दर्जा हमी कक्ष तसेच एरोजेल मटेरिअल रिसर्च सेंटर, यौनसाई विद्यापीठ, दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरडिसीप्लिनरी अप्रोचेस इन सायन्स, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयावर मंगळवारी (दि.१७) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.
या परिषदेचे उदघाटन प्रमुख पाहुणे व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे असतील.
परिषदेसाठी बीजभाषक म्हणून पुणे येथील सी-मेटचे शास्त्रज्ञ डॉ. सुधीर अरबुज, साधनव्यक्ती म्हणून हिरोशिमा विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. अकिओ किमुरा तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. के. वाय. राजपुरे व केबीपी विद्यापीठ, साताराचे रिसर्च डायरेक्टर डॉ. एस. एच. मुजावर हे चेअर पर्सन म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर समारोप समारंभासाठी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेस शास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाशी संबंधित देशविदेशातील नामवंत संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे समन्वयक प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, सहसमन्वयक संशोधन व विकास कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाटेगावकर आणि प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी दिली.
——————————
किसन वीर महाविद्यालयात मंगळवारी शास्त्र शाखेवर आंतरराष्ट्रीय परिषद
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
2.1kmh
26 %
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

