• कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१व्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका सौ. रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर ४६व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर व उपमहापौर यांच्या निवडी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महायुतीचा भगवा फडकला तसेच भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान सौ. रुपाराणी निकम यांना मिळाला.
महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर निवडीची विशेष सभा झाली. महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका सौ. रुपाराणी निकम व कॉंग्रसकडून सचिन शेंडे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी पिठासन अधिकारी यांनी या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.
यानंतर महापौरपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ. रुपाराणी निकम यांना ४६ मते तर सचिन शेंडे यांना ३५ मते पडली. सौ. रुपाराणी निकम यांना सर्वाधिक ४६ मते पडल्याने त्यांची महापौरपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी यांनी घोषित केले. नूतन महापौर सौ. रुपाराणी संग्रामसिंह निकम या प्रभाग क्रमांक १८ क या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान सौ. रुपाराणी निकम यांना मिळाला आहे.
उपमहापौर पदासाठी शिवसेना जनसुराज्य गटाचे- महायुतीचे नगरसेवक अक्षय विक्रम जरग व कॉंग्रसकडून दुर्वास कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी पिठासन अधिकारी यांनी सदरच्या अर्जांची छाननी करुन दोन्हीं अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.
यानंतर उपमहापौर पदासाठी हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये नगरसेवक अक्षय जरग यांना ४६ मते तर दुर्वास कदम यांना ३५ मते पडली. नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांना सर्वाधिक ४६ मते पडल्याने त्यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी यांनी घोषित केले. नुतन उपमहापौर अक्षय विक्रम जरग हे प्रभाग क्रमांक १० ड या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. महापालिकेत यापूर्वी विक्रम जरग हे उपमहापौर झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा अक्षय जरग हा उपमहापौर झाला.
ही निवडणूक प्रक्रिया मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, घरफाळा अधिक्षक अशोक यादव यांनी पिठासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडीनंतर पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, नगरसचिव सुनिल बिद्रे, अधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका यांनी नूतन महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कोल्हापूरच्या महापौरपदी सौ. रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी अक्षय जरग
Mumbai
clear sky
30.4
°
C
30.4
°
30.4
°
73 %
6kmh
5 %
Mon
30
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

