कोल्हापूर :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत E-KYC पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद केली आहे, अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ मार्चपर्यंत उपलब्ध करून दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने या बाबीचा सकारात्मक विचार करून, ज्या लाभार्थी महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत E-KYC पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद केली आहे, अशांसाठी ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ मार्च पर्यंत उपलब्ध करून दिली आहे.
यासंदर्भात योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक सुधारणा करण्यात आली असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी दिली आहे.
E-KYC सुधारण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत
Mumbai
overcast clouds
28.1
°
C
28.1
°
28.1
°
82 %
3kmh
100 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

