कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)ची महिला क्रिकेट खेळाडू अनुजा पाटीलची बीसीसीआय मार्फत घेण्यात येणाऱ्या सिनियर वुमन्स ट्राॅफी एकदिवशीय महिला स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ही स्पर्धा ६ ते १८ फेब्रुवारीपर्यंत राजकोट येथे होणार आहे.
स्पर्धेतील अ गटात महाराष्ट्रासह आसाम, बडोदा, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडीसा, पाॅडेचरी व उत्तर प्रदेश या सात राज्याचा समावेश आहे.
अनुजा पाटीलची यापूर्वी २०१३-१४ ला भारतीय टी-२०, एशिया कप व चॅलेंजर ट्राॅफी स्पर्धेसाठी भारतीय संघात, तसेच महाराष्ट्र १९ वर्षाखालील संघात सलग ४ वर्षे व त्यामधील २ वर्षे कर्णधार, महाराष्ट्र खुला गट महिला संघात सलग ६ वर्षे व त्यामध्ये सन २०१२-१३ व २०१३-१४ अशी २ वर्षे कर्णधारपदी निवड झाली होती. अनुजा पाटील हीची यापूर्वी २०१३-१४ वर्षी भारतीय टी-२०, एशिया कप, चॅलेंजर ट्राॅफी स्पर्धेसाठी व भारतीय संघात ऑस्ट्रेलिया व श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली होती. ती २०१९-२० मध्ये महिला प्रिमीयर लीग खेळली आहे. तसेेच गेली तीन वर्षे ती महिला महाराष्ट्र प्रिमीयर लीग खेळत आहे. गेल्या वर्षी महिला महाराष्ट्र प्रिमीयर लीग पुणेरी वॉरीयर्स संघाच्या कर्णधार पदाबरोबरच विजेतेपद पटकावले.
कोल्हापूरची अनुजा पाटील महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.1
°
C
28.1
°
28.1
°
82 %
3kmh
100 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

