Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रम

डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रम

• महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेसोबत सामंजस्य करार
कोल्हापूर :
गुणवत्तापूर्ण व अनुभवात्मक शिक्षण आणि जागतिक गरजा लक्षात घेऊन सुरु केलेले नवनवे अभ्यासक्रम यामुळे अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठामध्ये लवकरच एमबीए ग्लोबल अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे.
या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख अभ्यासक्रमासह जागतिक व्यवसाय व्यवस्थापनाची सखोल माहिती दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या करारावर कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत आणि महाराष्ट्र एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित थंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी फार्म हेड अमोल गाताडे, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, एमबीए ग्लोबलमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल व त्यांना करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील. आधुनिक उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत म्हणाले, विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा. हा अभ्यासक्रम निश्चितच आपल्या करिअरला नवी दिशा देईल.
एमबीए ग्लोबल (इंटरनॅशनल) कार्यक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी जागा मर्यादित असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हा सामजस्य करार करण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपचे फार्म हेड अमोल गाताडे यांनी परिश्रम घेतले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4 ° C
28.4 °
28.4 °
83 %
9.9kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page