Homeइतरकेंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा

केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा

• भिमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
कोल्हापूर :
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, ऑरगॅनिक शेतीवर भर कसा द्यावा यावर वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन नेहमीच भिमा कृषी प्रदर्शनात मिळते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीवर अधिक भर द्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी भिमा कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेटची संकल्पना आणली आहारामध्ये मिलेटचा वापर होणे गरजेचे असल्याचे मतही खा. धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये  करावा असे खासदार धनंजय महाडिक यांनी आवाहन केले.
खा. धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचे शुक्रवारी फीत कापून थाटात उदघाटन संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा. धनंजय महाडिक यांनी, शेतीमध्ये नवे प्रयोग, बदल स्वीकारण्यासाठी आवश्यक माहितीपूर्ण असणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन उदघाटनप्रसंगी केले. शेतकरी म्हटले की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हटले की तोटा हे नेहमी ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत आलो आहे. यामुळेच अठरा वर्षांपूर्वी भिमा कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी सुरू केले. आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती तंत्रज्ञान याची माहिती मिळते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न दरवर्षी असतो. नवनवीन बी बियाणे, ड्रोन टेक्नॉलॉजी, एआयचा वापर करून सेंद्रिय शेती कशी करावी, यावर भर दिला जातो. असे परिपूर्ण प्रदर्शन गेले अठरा वर्षे सातत्याने भरवले जात आहे असे खा. महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर महापालिकेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आभार मानले.
उदघाटनप्रसंगी माजी आमदार महादेवराव महाडिक, महापौर सौ. रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांची विशेष उपस्थिती होती. भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळ संचालक अमरीश घाटगे, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापालिका नगरसेवक आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.
दरम्यान, भारतातील सर्वात मोठा  अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा), चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी भिमा कृषी व पशू प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर १६ फेब्रुवारी पर्यंत भरविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
84 %
10kmh
99 %
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page