• महाराष्ट्र फुटबॉल लीग (एमएफएल)ची अधिकृत घोषणा
कोल्हापूर :
कोल्हापूर व फुटबॉलचं नातं अतूट आहे. येथील पेठापेठांत फुटबॉलचे संघ संस्थान काळापासून आकाराला आले आणि फुटबॉल हा प्रत्येकाच्या नसानसात भिनत गेला. राजाश्रय लाभलेल्या फुटबॉल खेळाला नंतर लोकाश्रय वाढतच गेला आणि येथील फुटबॉल लोकप्रिय झाला. कोल्हापूरकरांनी कुस्तीनंतर सर्वाधिक प्रेम केलं ते फुटबॉल या खेळावर! अशा या फुटबॉल वेड्या कोल्हापूरात आता महाराष्ट्र फुटबॉल लीग होणार आहे. महाराष्ट्र फुटबॉल लीग (एमएफएल)ची अधिकृत घोषणा विफाचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती आणि प्रोस्पोर्ट्झ प्रायव्हेट लिमिटेडचे अनिरुद्ध कोले यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील द पॅव्हेलियन हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, प्रा. अमर सासने, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, संभाजीराव मांगोरे पाटील, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र फुटबॉल लीग संदर्भात मालोजीराजे छत्रपती आणि अनिरुद्ध कोले यांनी सांगितले की, महाराष्ट्र फुटबॉल लीग ही स्पर्धा प्रोस्पोर्ट्झ प्रायव्हेट लिमिटेड, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आणि कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक पातळीवर फुटबॉलला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ही लीग सुरु करण्यात येत आहे. ही स्पर्धा आयपीएल आणि आयएसएलच्या धर्तीवर फ्रेंचायझी पद्धतीने आयोजित केली जाणार आहे.
या पहिल्या हंगामात महाराष्ट्रातील विविध शहरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १० वरिष्ठ पुरुष संघांचा सहभाग असेल. मुंबई, पुणे, नागपूर व कोल्हापूर या शहरांमध्ये फुटबॉल खेळाडूंची ट्रायल घेऊन ५०० खेळाडू बोलीसाठी निवडले जातील. त्यामधून संघमालक आपला संघ निवडतील. १० संघात कोल्हापूरचे प्रत्येकी तीन खेळाडू असतील. स्पर्धा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल. या स्पर्धेतील सामने कोल्हापूरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर डे – नाईट होतील. १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यांना नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. स्पर्धेचे सामने राज्यभर आणि देशभर पोहोचविण्यासाठी झी ५ आणि सोनी लिव यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी चर्चा सुरु आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र फुटबॉल लीग ही केवळ एक स्पर्धा नसून, पुढील पाच वर्षांसाठी राज्यात फुटबॉलची मजबूत पायाभरणी करण्याचा दीर्घकालीन उपक्रम आहे. जिल्हा स्तरावर खेळाडू शोध मोहीम राबवणे, तरुण खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, प्रशिक्षक व पंचांच्या विकासासाठी उपक्रम राबवणे आणि व्यावसायिक भागीदारी वाढवणे हा या लीगचा उद्देश आहे. पुढील काही वर्षात महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य फुटबॉल राज्यांमध्ये स्थान मिळवून देण्याचा संकल्प या लीगच्या माध्यमातून करण्यात आला आहे. स्पर्धेसाठीच्या फ्रँचायझी मालकांची घोषणा, खेळाडू निवड चाचण्या, लिलाव प्रक्रिया आणि अधिकृत सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
——————————
कोल्हापूरात होणार महाराष्ट्र फुटबॉल लीग
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
84 %
10kmh
99 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°

