• संजय घोडावत ग्रुप व वारणा उद्योग समूह यांच्या संयुक्त उपक्रमातून विमान प्रवास
कोल्हापूर :
संजय घोडावत ग्रुप आणि वारणा उद्योग समूह यांनी आमदार विनय कोरे व संजय घोडावत यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे राबविलेल्या विशेष उपक्रमातून ४३ महिला प्रवाशांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाची संधी मिळाली. स्टार एअरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा प्रवास संबंधित महिलांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला.
याप्रसंगी बोलताना संजय घोडावत म्हणाले की, ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबांतील महिलांना हवाई प्रवासाचा अनुभव देऊन त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. जीवनातील पहिलाच विमानप्रवास करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, कुतूहल आणि समाधान स्पष्ट दिसत होते.
स्टार एअरकडून या महिला प्रवाशांचे एअर पोर्टवर विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले की, आपल्या आयुष्यातील पहिलाच विमानप्रवास करणाऱ्या या महिलांच्या प्रवासाचा भाग होण्याची आणि त्यांच्या दीर्घकाळ जपलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान स्टार एअरला वाटत आहे.
अशा उपक्रमांमुळे प्रादेशिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाबाबतची बांधिलकी अधोरेखित होत आहे. हवाई प्रवास अधिकाधिक समुदायांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने स्टार एअर सातत्याने प्रयत्नशील आहे. स्टार एअर सध्या देशभरातील ३१ विमानतळांवर सेवा देत असून प्रादेशिक संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. उदयोन्मुख शहरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवासी-अनुकूल हवाई सेवा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचेही मत यावेळी स्टार एयरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमरन यांनी व्यक्त केले.
४३ महिलांची पहिल्या विमान प्रवासाची स्वप्नपूर्ती
Mumbai
few clouds
27
°
C
27
°
27
°
89 %
3.1kmh
15 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°

