• लवकरच दुहेरीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार : खा. धनंजय महाडिक
कोल्हापूर :
कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणे तसेच रेल्वे गाड्यांचे क्रॉसिंग याला मर्यादा येत होत्या. त्यामुळे कोल्हापूर ते मिरज या सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण व्हावे ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घकाळची मागणी आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या प्रश्नासाठी पाठपुरावा केला. त्यातून कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
सुमारे ४७ किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय ९८४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण होईल, याची खात्री वाटत आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
एकदा का कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले की अनेक लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील. शिवाय वंदे भारत सारख्या नव्या आलिशान रेल्वे गाड्या कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली सुमारे दोन दशके कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे ही मागणी होती. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते. खासदार महाडिक यांनी या प्रश्न संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण लवकरच पूर्ण होईल, आणि कोल्हापूरकरांची मागणी लवकरच पूर्ण होईल.
——————————
कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ९८४ कोटींचा निधी मंजूर
Mumbai
few clouds
27
°
C
27
°
27
°
89 %
3.1kmh
15 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°

