कोल्हापूर :
भारती विद्यापीठ पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘खेलो भारती’ आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद मिळवले.
ही स्पर्धा इंजिनियरिंग आणि आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील आर्किटेक्चर संघाने पहिल्या साखळी सामन्यात प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर २-० गोलने विजय मिळवला. सिंहगड कॉलेज संघावर १-० तर भारती विद्यापीठ संघावर १-० ने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-० असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग कॉलेज संघावर दोन गोल नोंदवून डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजेत्या संघात कर्णधार अनिश पवार, गोलरक्षक यश पवार, ओम सुतार, रितेश कोरवी, श्रेयस खवरे, आदित्य गवळी, वेदांत खारशिंगे, विजयसिंह घाडगे, पुष्कर मालगावकर, देवाशीष सरनोबत, आर्यन खवटे, प्रसाद पाटील, सुजल हळदे, यश पवार, अथर्व जाधव या खेळाडूंचा समावेश होता.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, डीन स्टुडन्ट अफेयर्स प्रा. डॉ. राहुल पाटील, आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रा. आय. एस. जाधव व क्रीडा समन्वयक प्रा. कृष्णाली पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
82 %
9.7kmh
100 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

