कोल्हापूर :
इंग्रजी शाळांना कोणत्याही पद्धतीचे शासनाचे अनुदान नसते तरीही या शाळा विद्यार्थी घडविण्याचे काम करतात. या शाळेतील शिक्षक अहोरात्र झटून या मुलांना ज्ञान देतात त्यांच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा गौरव करण्यासाठी “EMSA INSPIRE 2026- Maharashtra State-Level Celebration of Educational Excellence” हा राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिक्षकांना उद्देशून बोलताना आपण विद्यार्थ्यांना घडवितो मात्र हे घडवत असताना स्वतःवरचा विश्वासही वाढवण्याचे काम सर्वांनी करणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली. मी नेहमीच सगळ्यांचा सहकारी म्हणून सगळ्यांसमोर उभा राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी अध्यक्ष के. डी. पाटील यांनी, शिक्षकांना त्यांच्या कामाची पावती मिळावी त्यांना त्यांचे काम आणि प्रामाणिकपणा याबाबत मानसन्मान मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिक्षकांच्या पाठीशी असोसिएशन नेहमीच उभे राहील असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना महेश पोळ यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची इमारत उभी करण्याचे काम इंग्रजी शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापक करत आहेत या सर्व शिक्षकांनी भरपूर असे अधिकारी घडविले आहेत असे सांगितले.
बाळासाहेब राऊत यांनी सर्व शिक्षकांच्या कामाचे कौतुक करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विवेकानंद कॉलेजचे कौस्तुभ गावडे यांनी व्हिडिओद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणेश नायकुडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार सुहेल बानदार यांनी मानले. सूत्रसंचालन गायत्री कुलकर्णी आणि शशिकांत मुद्दापुरे यांनी केले. या कार्यक्रमाला एन. एन. काझी, नितीन पाटील, सचिन नाईक, विल्सन वास्कर, दत्तात्रय रणदिवे, अमर सरनाईक, संजय जाधव आदी उपस्थित होते.
——————————
चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांकडून : पालकमंत्री
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.4
°
C
28.4
°
28.4
°
81 %
2.5kmh
42 %
Thu
30
°
Fri
32
°
Sat
31
°
Sun
30
°
Mon
29
°

