• सलग तिसऱ्यांदा पटकावला गॅपरिंदाश्विली करंडक
कोल्हापूर :
उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकत्याच पार पडलेल्या ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या गटात रौप्य पदक, महिला गटात कांस्य पदक पटकावताना भारतीय बुद्धिबळपटूंनी सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडकावर मोहर उमटविली आणि जागतिक बुद्धिबळावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. चेन्नई येथे २०२२ मध्ये आणि बुधापेस्ट २०२४ मध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडनंतर भारतीयांची सर्वसाधारण विजेतेपदाची ही हॅटट्रिक ठरली.
खुल्या गटातील भारतीय संघात प्रशिक्षक ग्रँडमास्टर श्रीनाथ नारायणन यांच्या नेतृत्वाखाली अर्जुन इरिगेसी, आर प्रज्ञानंद, निहाल सरीन, जगज्जेता डी गुकेश आणि विदित गुजराथी या ग्रँडमास्टरचा समावेश होता. तर, महिला संघात प्रशिक्षक ग्रँडमास्टर स्वयंम्स् मिश्रा याच्या नेतृत्वाखाली कोनेरू हंपी, दिव्या देशमुख, आर वैशाली या ग्रँडमास्टरसह वंतिका अग्रवाल, सविता श्री बी या आंतरराष्ट्रीय मास्टरचा समावेश होता.
वैयक्तिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. सविता श्री हिने पदार्पणातच पाचव्या पटावर अपराजित राहताना १० पैकी ९ गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. जॉर्जिया विरुद्धच्या अंतिम फेरीत बरोबरी साधल्यामुळे भारतीय संघाला कांस्य पदक मिळवता आले. दिव्या देशमुख हिने दुसऱ्या पटावर रौप्य पदक, डी गुकेशने रौप्य पदक, तर कोनेरू हंपी व वंतिका अग्रवाल यांनी कांस्य पदके पटकावली.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे या सर्व संघांचे पथक प्रमुख होते. भारतात परतल्यानंतर पुणेकर बुद्धिबळप्रेमींतर्फे नगरसेवक सुनील पांडे यांनी त्यांचे स्वागत केले.
समरकंद ऑलिम्पियाडवर आशियाई संघांनी वर्चस्व गाजवताना ६ पैकी ५ सांघिक पदके पटकावली. त्यामध्ये खुल्या गटात उझबेकिस्तान भारत व जर्मनी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर राहिले. तर महिला गटात चीन, कझाकस्तान आणि भारत यांनी पहिली तीन स्थाने पटकावली. भारत सरकारचा सर्वांगीण पाठिंबा आणि राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणारे क्रीडा क्षेत्राला पोषक असे धोरण यामुळे भारताला हे यश मिळाले, असा विशेष उल्लेख अभिजीत कुंटे यांनी केला.
या अभूतपूर्व यशाबद्दल आम्ही संपूर्ण भारतीय बुद्धिबळ संघाचे हार्दिक अभिनंदन करतो आणि हे यश साजरे करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे पुणे डिस्ट्रिक चेस सर्कलच्या पत्रकात म्हटले आहे.
——————————
भारतीय बुद्धिबळपटूंची आगळी वेगळी हॅटट्रिक
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
31.6
°
C
31.6
°
31.6
°
52 %
2.1kmh
14 %
Sat
31
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

