कोल्हापूर :
कोल्हापूरच्या सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजित विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’च्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन ‘विकसित कोल्हापूर २०४७’ या विकासदृष्टीची माहिती दिली.
यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट व्यासपीठाच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची तसेच शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या समन्वयात्मक पाठपुराव्याची माहिती राज्यपालांना दिली.
कोल्हापूरचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक महत्त्व जपत आधुनिक सुविधा, उद्योग, रोजगार, पर्यटन, शिक्षण, कौशल्यविकास आणि पायाभूत सुविधांनी सक्षम असे भविष्यवेधी कोल्हापूर घडविण्याचा ‘कोल्हापूर फर्स्ट’चा प्रयत्न असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.
यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे कोल्हापूरच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी विशेष फोटो फ्रेम तसेच विकासविषयक निवेदन राज्यपालांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कोल्हापूरच्या वारशाचे जतन आणि आधुनिक विकास यांचा समन्वय साधण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.
‘कोल्हापूर फर्स्ट’च्या वतीने शासन, उद्योगक्षेत्र आणि समाज यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून कोल्हापूरच्या दीर्घकालीन विकासाला गती देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार तसेच मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव, डी. वाय. पाटील ग्रुप चेअरमन संजय डी. पाटील, उद्योजक नीरज झंवर, राजीव पाटील, अजय कोराणे आदी उपस्थित होते.
——————————
‘विकसित कोल्हापूर २०४७’साठी राज्यपालांकडे ‘कोल्हापूर फर्स्ट’ची भूमिका
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.4
°
C
28.4
°
28.4
°
81 %
2.5kmh
42 %
Thu
30
°
Fri
32
°
Sat
31
°
Sun
30
°
Mon
29
°

