कोल्हापूर :
बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद आणि शेकडो मावळ्यांच्या असीम त्याग, बलिदानामधून स्वराज्य निर्मितीचा मार्ग सुकर झाला. स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान भावी पिढीस समजावे, त्याची जाणीव रहावी म्हणून युवकांसाठी अशा मोहिमा गरजेच्या आहेत, असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी आणि दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित पन्हाळा-पावनखिंड शिवशौर्यगाथा पदभ्रमंती मोहीम जवळपास २०० विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने संपन्न झाली. या मोहिमेचे उदघाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षणा संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पन्हाळा नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पोवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास १२० हून अधिक विद्यार्थीनींनी ही खडतर मोहीम पूर्ण केली.
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या बाजीप्रभू देशपांडे आणि शूर मावळ्यांच्या बलिदानास नमन म्हणून मोहिमेचे आयोजन करण्यात आले. पन्हाळा राजदिंडी मार्गावरून सुरु झालेली ही पदभ्रमंती मोहीम मसाईच्या पठारमार्गे करपेवाडी येथे मुक्कामी पोहोचली. दरम्यान, मसाई पठार येथे डी.के.ए.एस.सी. कॉलेज इचलकरंजीचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. संदीप गावडे यांनी अत्यंत दुर्मिळ फुलांची माहिती सांगताना तेथील जैवविविधतेचे महत्व विषद केले. संध्याकाळी करपेवाडी येथे प्रा. मधुकर पाटील यांचे “पावनखिंडीचा रणसंग्राम” या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी विवेकानंद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील प्रमुख उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऐतिहासिक गाणी, काव्ये, शाहिरीचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून सादर झाले. त्यानंतर करपेवाडी ते पांढरपाणी हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करून पावनखिंडीत या मोहिमेचा समारोप झाला.
या मोहिमेत श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या प्र. प्राचार्य डॉ. श्रुती जोशी, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील भोसले, डॉ. धीरज शिंदे, प्रा. अंकुश कुरणे, प्रा. स्वात्त हळवणकर, प्रा. निशा सुर्वे, प्रा. रोहिणी रेळेकर, प्रा. राहूल कांबळे, प्रा. संदीप पाटील, प्रा. निलेश जाधव, डॉ. सुभा जाधव, प्रा. पूजा परिशवाड, प्रा. वर्षा शिंदे, प्रा. रुपाली सांबरे, डॉ. महबूब माणगावे, डॉ. संदीप लोखंडे यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेस श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, डी.के.ए.एस.सी. कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. खाडे यांचे प्रोत्साहन लाभले.
——————————
असीम त्याग, बलिदानाचे प्रतिक म्हणजे पावनखिंडचा रणसंग्राम : प्राचार्य अभयकुमार साळुंखे
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29
°
C
29
°
29
°
79 %
2.6kmh
11 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°

